पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेनने बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे.लक्ष्य सेनने नेत्रदीपक शैलीत बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूचा पराभव केला. तीन गेम रंगलेल्या या सामन्यात लक्ष्यने चायनीज तैपेईचा खेळाडू चाऊ तिएन चेनचा पराभव करत पदकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चू टिन चेनविरुद्ध तीन गेमच्या रोमहर्षक विजयासह, सेन अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे यापूर्वी कोणताही भारतीय पुरुष शटलर पोहोचला नव्हता.
हा खेळ अतिशय चुरशीचा झालेला दिसून आला. खेळाची सुरवात होताना पहिल्या सेटच्या सुरुवातीला लक्ष्य सेन आणि चीनच्या चू तिएन चेन यांच्यात निकराची लढत झाली. एका वेळी दोन्ही खेळाडू बरोबरीने होते. आणि स्कोअर ९-९ असा होता. यानंतर चू तिएन चेनने आघाडी घेण्यास सुरुवात केली. मात्र, आघाडी घेतल्यानंतर चू तिएन चेनने काही चुका केल्या. लक्ष्य सेन आणि चू तिएन चेन यांच्यातील चुरशीची लढत कायम दिसत राहिली. कधी सेनने पुढाकार घेतला तर कधी चू पुढे. हळूहळू सेनने वर्चस्व राखण्यास सुरुवात केली आणि स्कोअर १८-१४ पर्यंत पोहोचला. यादरम्यान चू तिएन चेननेही काही चुका केल्या. लक्ष्यने याचा पुरेपूर फायदा घेत आक्रमक खेळ खेळत दुसरा गेम २१-१५ असा जिंकला.
.