पुण्यात आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपा व अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अहमदशहा अब्दाली असे संबोधले आहे. ते मला नकली संतानम्हणतात, औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणतात. त्यामुळे मी देखील आता त्यांना अहमदशहा अब्दाली म्हणणार आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे हताश झाले आहेत. त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. आपण औरंगजेब फॅन क्लबचेच असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. ते सध्या खूप फ्रस्टेशनमध्ये ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, त्यावर काय उत्तर देणार? एखादी व्यक्ती फ्रस्टेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखं बोलत असते त्यावर उत्तर द्यायचे नसते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”सचिन वाझे यांनी नार्को टेस्ट साठी तयार असल्याचे म्हटले आहे. हे मी माध्यमांमधूनच पाहिले आहे. मला पत्र पाठवले हे देखील मी माध्यमांमध्येच पाहिले आहे. मी सध्या नागपुरात असल्याने याबद्दल मी काही माहिती घेतलेली नाही. असे काही असल्यास त्याची माहिती घेऊन मी त्यावर बोलेन. ”