या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा केली गेली असल्याचे सांगितले जात आहे.या आधीही २२ जुलै रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
राज ठाकरे यांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावरही शिंदे यांची भेट घेतली महायुतीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झालेली ही पहिलीच भेट आहे. चाळींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यांवर ते शिंदे यांच्याशी संवाद साधला असल्याचे सांगितले जात आहे तसेच , राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली आहे.
सीएमओच्या म्हणण्यानुसार, राज ठाकरे यांनी मुंबई विकास संचालनालय (बीडीडी) चाळींचा पुनर्विकास, पोलिस गृहनिर्माण वसाहतींचा पुनर्विकास आणि इतर काही गृहनिर्माण प्रकल्पांसारख्या गृहनिर्माणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळासह सीएम शिंदे यांची भेट घेतली या बैठकीला महाराष्ट्र सरकारचे इतर काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 250 जागा स्वतंत्रपणे लढवण्याचा मानस राज ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केला होता.