राज्यात लवकरच येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर होते.यावेळी मला पुढील तीन महिने द्या राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार आणून दाखवतो असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजप महाराष्ट्र सावध झाला आहे. विधानसभेसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचे आवाहन अथवा आदेश फडणवीसांनी दिले आहेत.
अमरावतीमधील भाजपच्या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”राज्यामध्ये पुन्हा एकदा नव्या दमाने उतरण्याची गरज आहे. आपण जर का एकजुटीने विधानसभेच्या मैदानात उरतलो तर राज्यात महायुतीचा झेंडा रोवण्याशिवात कोणी रोखू शकत नाही. कोण खोटे आहे आणि कोण खरे आहे जे जनतेच्या लक्षात आले आहे. आता पुढील तीन महिने तुम्ही मला द्या, राज्यात तुमचे सरकार आणून दाखवतो.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”तुमच्यासारखे मावळे सोबत असतील तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राज्यात तुमचे सरकार आणून दाखवतोच. आपल्यासोबत अपघात झाला आहे. खिंडीत एकदाच कोणाला तरी पकडता येते. मात्र आता काळजी करू नका. आपण पूर्ण ताकदीने मैदानात उरतलो तर यश आपल्यापासून दूर नाही. राज्यात सर्व जागा महायुती जिंकू शकते अशी हवं राज्यात पाहायला मिळत आहे.