डीएमके नेते आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री एस.एस. शिवशंकर यांनी भगवान श्रीरामांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. “आम्ही चोल वंशाचा सम्राट राजेंद्र चोल यांचा वाढदिवस साजरा करतो, कारण आपल्याकडे शिलालेख, त्यांनी बांधलेली मंदिरे आणि त्यांनी तयार केलेले तलाव असे पुरातत्वीय पुरावे आहेत. परंतु, प्रभू रामाचा इतिहास शोधण्यासाठी कोणताही पुरावा नाही,”, असे ते म्हणाले आहेत. अरियालूर जिल्ह्यातील गंगाईकोंडाचोलापुरम येथे राजेंद्र चोला यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हे वक्तव्य त्यांनी केले आहे.
डीएमकेचे मंत्री शिवशंकर म्हणाले की, आम्ही चोल वंशाचे सम्राट राजेंद्र चोल यांचा जन्मदिवस साजरा करतो. कारण आमच्याकडे शिलालेख, त्यांनी बांधलेली मंदिरं आणि त्यांनी बांधलेले तलाव यासारखे काही पुरातत्विय पुरावे आहेत. मात्र, भगवान रामाच्या इतिहासाचा शोध घेण्यासाठी कुठलाही पुरावा नाही आहे. भगवान राम हे 3 हजार वर्षांपूर्वी होते, असा दावा करण्यात येतो. ते अवतारी पुरुष होते, असे सांगितले जाते. मात्र, अवतार जन्माला येऊ शकत नाही. जर राम अवतार होते, तर त्यांचा जन्म होऊ शकत नाही. तसेच जर त्यांचा जन्म झाला असेल तर ते देव असू शकत नाहीत असा दावाही त्यांनी केला आहे.
यावेळी शिवशंकर यांनी यावेळी रामायण आणि महाभारतावर टीका केली. ते म्हणाले की, रामायण आणि महाभारतामध्ये लोकांना शिकण्यासारखा कुठला धडा नाही आहे. मात्र तामिळ कवी तिरुवल्लूर यांनी 2 हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या दोह्यांच्या संग्रहामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे.
दरम्यान, शिवशंकर यांनी केलेल्या विधानांवर भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपाचे तामिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी डीएमकेचे नेते शिवंशकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला आहे. ते म्हणाले आहेत की, द्रमुक पक्षाला प्रभु श्रीरामाचा इतका तिटकारा का ? त्यांनी प्रभु श्रीरामाचा उल्लेख आताच का काढला ? नवीन संसदेच्या इमारतीमध्ये जेव्हा चोल साम्राज्याचा सेंन्गोल (जुन्या काळातील राजदंड) ठेवला गेला, तेव्हा याच लोकांनी त्यास विरोध केला होता