Nitesh Rane : हिंदू समाजाच्या असंख्य जमिनी हडपणाऱ्या मुस्लिम वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा आणली जातेय ही प्रचंड स्वागतार्ह बाब असे मत भाजपची मुलुख मैदानी तोफ,आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे. आमदार राणे यांनी आपल्या एक्स खात्यावर एक व्हिडिओ पोस्ट करून या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यात वक्फ बोर्ड खूप मोठी भूमिका निभावतो आहे. पण हा कुटील डाव आमचं मोदी सरकार अर्थात एनडीए हाणून पाडेल आणि या कायद्यात दुरुस्ती झाली की असंख्य हिंदु कुटुंबान्ना आपली हक्काची पण हडपली गेलेली जागा परत मिळेल असा विश्वास देखील आमदार राणे यांनी पुढे व्यक्त केला.
https://x.com/i/status/1819960445446308131
दरम्यान,गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून ते अनेक माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरणाऱ्या वक्फ बोर्डच्या संपत्तीचा विषय केंद्र सरकारने देखील मनावर घेतेलेला दिसतोय. आजमितीला वक्फ बॉर्डकडे रेल्वे,संरक्षण खात्यानंतर सर्वाधिक जमीन असल्याच समोर आलय. तसेच एकदा का वक्फ बोर्डाने तुमच्या जमीनीवर ताबा सांगितला तर त्यात फक्त सुप्रीम कोर्टा व्यतिरिक्त कुणीच हस्तक्षेप करू शकतं नाहीं असा तुघलकी कायदा वक्फ बोर्डाचा आहे त्यामुळे त्यात सुधारणा हवी अशी आग्रही मागणी केली जातेय.