Pune Rain Update : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा पुण्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. काल पासून पुण्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली तर रविवारी सकाळपासूनच धो-धो पाऊस पडत आहे. अशा स्थितीत पुण्याला पुन्हा पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.
सलग सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मूळा मुठा नदी पात्रात करण्यात आला आहे. या परिस्थितीत नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सिंहगड रस्त्यावरील एकतानगरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. द्वारका सोसायटी पूर्ण रिकामी केली आहे.
याच पार्श्ववभूमीवर सिंहगड रस्ता येथील एकता नगरी याठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी सनसिटी अग्निशमन केंद्र आणि पीएमआरडीए अग्निशमन वाहने तीन बोटींसह कार्यरत आहेत. तर नवले अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन निंबोज नगर येथे कार्यरत आहेत.
जनता अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन दत्तवाडी घाट येथे कार्यरत आहेत. कसबा अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन नदीपत्रातील भिडे पूल येथे कार्यरत आहेत. एरंडवणा अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन नदीपात्र पुलाचीवाडी येथे कार्यरत आहेत. तर येरवडा अग्निशमन केंद्र अग्निशमन वाहन व पीएमआरडीए येथील रेस्क्यू व्हॅन विश्रांतवाडी याठिकाणी कार्यरत आहेत. नायडू अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन ताडीवाला रोड याठिकाणी कार्यरत आहेत.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
-पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे.
-तसेच नागरिकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचे दिले आदेश दिले आहेत.
-एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी.