Wayanad landslide : साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुनने वायनाड भूस्खलनग्रस्तांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर, आता साऊथचा अभिनेता चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी केरळ सीएम रिलीफ फंडात 1 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
अभिनेत्याने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे केरळमध्ये झालेल्या दुःखद मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. तसेच या कठीण काळातून जात असलेल्या सर्व लोकांसाठी प्रार्थना देखील केली. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना आपला जीव गमवाल लागला. पुढे त्यांनी लिहिले, ‘चरण आणि मी मिळून केरळच्या सीएम रिलीफ फंडात पीडितांना आमच्या समर्थनाचे प्रतीक म्हणून 1 कोटी रुपयांचे योगदान देत आहोत’
https://x.com/KChiruTweets/status/1820017825366651291
दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जुनने देखील X वर एक पोस्ट शेअर केली आणि पीडितांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपयांची देणगीही दिली आहे.
भूस्खलनात आत्तापर्यंत 360 हून अधिक लोकांचा मृत्यू
केरळमधील वायनाड येथे 30 जुलै रोजी पहाटे भूस्खलन झाले. या दुर्घटनेला सहा दिवस उलटून गेले तरी अजूनही येथे बचाव कर्ज सुरु आहे. या दुर्घटनेत अत्तापर्यंत 360 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १०० हून अधिक लोक रुग्णालयात आहेत, आणि २०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या भूस्खलनग्रस्त भागातील गावांमध्ये सहा झोनमध्ये बचाव कर्मचाऱ्यांची ४० पथके पीडितांचा शोध घेत आहेत.