Chandrakant Patil : डीपीसीच्या खर्चाविषयी भाजपनेते आमदार चंद्रकांतदादा बोलत होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनो तयार राहा, गाफिल राहू नका. कारण येत्या २० सप्टेंबरला आचारसंहिता लागेल.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. लोकसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. सरकार आणि विरोधी पक्ष आता कामाला लागले आहे. आचारसंहितेपूर्वीच विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच चंद्रकात पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार याची तारीख उघड करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते सोलापूरमध्ये बोलत होते.
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार चंद्रकांतदादा म्हणाले, ‘आज महाराष्ट्रमध्ये अनेकांना ते असह्य झालेत त्यामुळे अफवा पसरवत आहेत. त्यामुळे अनेकांनी देव पाण्यात बसलेत, ते कधी बाहेर जातील. त्यांनी भल्याभल्याना जेरीस आणलं आहे, कोणाला हे नावं विचारू नका. त्यांना वाटतं की या बाबाला घालवल पाहिजे, पण हे सांगणारे तुम्ही कोण? विधानसभा तोंडावर आहे केवळ भाजप नाही तर महायुतीला देवेंद्रजींच्या नेतृत्वाची गरज आहे. पण आम्ही नेतृत्वाची आज्ञा मानणारे आहोत. केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर देवेंद्र जी काही म्हणणार नाही आणि आम्ही काही म्हणण्याचा प्रश्न नाही.