Kangana Ranaut On Sheikh Hasina : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडला आहे. शेख हसीना आपला देश सोडून भारतात पोहोचल्या आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने शेख हसीना यांना बांगलादेश सोडून भारतात सुरक्षित वाटले, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे म्हटले आहे.
कंगना रणौतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, “भारत ही आपल्या आजूबाजूच्या सर्व इस्लामिक प्रजासत्ताकांची मूळ मातृभूमी आहे. बांगलादेशच्या माननीय पंतप्रधानांना भारतात सुरक्षित वाटत असल्याचा आम्हाला सन्मान आणि आनंद वाटतो.”
पुढे कंगनाने लिहिले, “परंतु भारतात राहणारे प्रत्येकजण विचारत आहे की हिंदू राष्ट्र का? रामराज्य का? बरं, हे स्पष्ट आहे का!!! मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लिमही नाही. आम्ही रामराज्यात राहणे ही भाग्याची गोष्ट आहे.
भाजप खासदार कंगना राणौत हिंदू धर्म आणि हिंदुत्वाशी संबंधित मुद्द्यांवर नेहमीच आपले मत उघडपणे व्यक्त करते. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारतात रामराज्य स्थापन झाले आहे, असा दावाही अभिनेत्रीने केला. आज पुन्हा एकदा तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, आम्ही भारतासारख्या देशात रामराज्यासह राहतो याचा आम्हाला आनंद आहे.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेश सोडून भारतात आल्या. त्यांचे विमान राजधानी दिल्लीजवळील गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना काही दिवस भारतात राहू शकतात आणि त्यानंतर त्या लंडनला रवाना होऊ शकतात.