राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांना तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणाबाबत आज उत्तर सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान सुप्रीम कोर्टाने मागणी मेनी करून अजित पवार गटाला उत्तर सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. दरम्यान अजित पवार गटाच्या प्रकरणात सुनावणी कोर्टासमोर आली असताना अजित पवार गटाने उत्तर सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान कोर्टाने त्यांची मागणी मान्य केली असून अजित पवार गटाला तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मागच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर एकत्रित सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाने ठरवले होते. निवडणूक आयोगाने शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील अशाच प्रकारचा निर्णय दिला आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.