काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘बांगलादेशात जे घडत आहे ते इथेही घडू शकते’ या विधानावर निशाणा साधत भारतीय जनता पक्षाने याला दुर्दैवी म्हटले आहे. हे भारतीय लोकशाहीची खिल्ली उडवणारे विधान असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती. आजही काँग्रेस नेत्यांमध्ये आणीबाणीची भावना बळावत आहे हे दुर्दैवी आहे. बांगलादेशात मंदिरे पाडणे, हिंदूंना मारणे, निवडक विरोधी नेत्यांना मारणे, काँग्रेसच्या लोकांना या सगळ्याचा आनंद होतो याचा विचार करणे तितकेच दुःखास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहेत
तर भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले की, एक प्रकारे सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसच्या वतीने आंदोलने आणि जाळपोळ करण्याचा इशारा दिला आहे, या कार्यक्रमाला शशी थरूर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते आणि त्यांनी एकप्रकारे त्या वक्तव्याचे समर्थन केले. राहुल गांधी जेव्हाही परदेशात जात असत तेव्हा ते अनेकांना गुपचूप भेटत असत. तिथे जाऊन ते काय बोलत असतील याचा अंदाज लावता येऊ शकतो.
उल्लेखनीय आहे की, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी मंगळवारी सांगितले की, बांगलादेशात जे काही घडत आहे ते भारतातही घडू शकते.येथे सर्वकाही सामान्य आहे असे दिसू शकते. आपण जल्लोष करत आहोत. कामात्र 2024 मधील विजय किंवा यश हे किरकोळ आहे. शिक्षणतज्ज्ञ मुजीबुर रहमान यांच्या ‘शिकवा-ए-हिंद: द पॉलिटकल फ्यूचर ऑफ इंडियन मुस्लिम्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खुर्शीद बोलत होते.