Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतीयांसाठी एक वाईट बातमी आली आहे. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. वजन जास्त असल्याने ती अपात्र ठरल्याचे मानले जात आहे. विनेश सोबतच 140 कोटी भारतीयांचे हृदय तुटले आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी विनेश आणि भारताला धक्का बसला आहे. तर यानंतर विनेश फोगटची प्रकृती बिघडली आहे. विनेश फोगटला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विनेश तिच्या ऐतिहासिक सुवर्णपदकापासून फक्त एक विजय दूर होती, पण त्याआधीच एक वाईट बातमी आली आहे. 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिला जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले. विनेश फोगटने मंगळवारीच पॅरिस ऑलिम्पिकचे प्री-क्वार्टर आणि क्वार्टर फायनल सामने जिंकून महिला फ्रीस्टाइल 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
तिचे वजन निर्धारित मानकांपेक्षा 50 ते 100 ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. विनेश फोगटने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानची ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू युई सुसाकी हिच्याविरुद्ध चांगला खेळ केला होता आणि तिने ३-2 ने विजय मिळवला होता. पॅरिस ऑलिम्पिक हे विनेश फोगाटचे तिसरे ऑलिम्पिक आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला दुखापतीमुळे थोड्या फरकाने कांस्यपदक जिंकता आले नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला 53 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत वेनेसा कलाडझिंस्कायाकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने यावेळीही तिचे स्वप्न भंगले.
विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधील कोणत्याही प्रकारची अंतिम फेरी गाठणारी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू होती. पुरुष गटात सुशील कुमार आणि रवी दहिया यांना ऑलिम्पिक फायनल खेळण्याचा अनुभव आहे पण या दोघांनाही फक्त रौप्य पदक जिंकता आले, अशा स्थितीत विनेशला कुस्तीत देशाची पहिली सुवर्णपदक विजेती बनण्याची संधी होती, पण तिचे वजन फक्त 50 ग्रॅमने जास्त असल्याने तिच्या स्वप्नांनावर पाणी फिरले.