Cabinet Meeting Decision : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागातील १२ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या जीवनावर होणार आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. कोणते निर्णय घेण्यात आले चला जाणून घेऊयात…
1.जलसंपदा विभाग :-
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार.
2.गृहनिर्माण विभाग :-
आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार, धोरणास मान्यता देण्यात आली आहे.
3.नगरविकास विभाग :-
लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार, कर्ज उभारण्यास मान्यता देण्यात आली.
4.आदिवासी विकास विभाग :-
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
5.आदिवासी विकास विभाग :-
अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्य अडचणी दूर होणार अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.
6.वन विभाग :-
विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड ठोठावला जाणार.
7.उद्योग विभाग :-
महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात ३० हजार कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
8.वैद्यकीय शिक्षण :-
कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय, आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय.
9.विधी व न्याय विभाग :-
न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा.
10.महसूल विभाग :-
सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट.
11.सहकार विभाग :-
जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय.
12.सांस्कृतिक कार्य विभाग :-
ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार.