‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक शासकीय केंद्रांवर महिलांनी या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे. दरम्यान आता या योजनेचा हप्ता कधी जमा होणार याची सर्वानाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान आता याबद्दल माहिती समोर आली आहे. १७ ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या आधीच योजनेचे दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजेच ३००० हजार रूपये खात्यात जमा होणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. दरम्यान मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करता येणार नाही असे सांगत हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे.
लाडकी बहीण योजनेला हायकोर्टात आवाहन देत पहिला हप्ता थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान सरकारने बजेटच्या अंतर्गत घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे सरकारी धोरणात हस्तक्षेप करता येणार नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोण असणार पात्र?
योजनेसाठी पात्र असण्यासाठी येथील महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेत विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्या आणि निराधार महिला देखील आपली नोंदणी करू शकतात. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. साठ वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.