Narendra Modi : पंतप्रधान मोदी 10 ऑगस्टला वायनाडला भेट देणार आहेत. ते हवाई प्रवासाद्वारे सर्वेक्षण करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. वायनाड भूस्खलनमध्ये अत्तापर्यंत 350 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, आणखी लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही वायनाडला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी विमान प्रवासादरम्यान सर्वेक्षण करणार असून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेणार आहेत.
हवाई सर्वेक्षण
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सर्वात आधी कन्नूरला पोहोचणार आहेत. येथून ते हेलिकॉप्टरद्वारे भूस्खलनग्रस्त भागांना भेट देतील. ते मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या पीडितांचीही भेट घेणार आहेत.
शोधमोहीम सुरूच
वायनाडमध्ये दहाव्या दिवशीही शोधमोहीम सुरू आहे. यावेळी अनेक मानवी शरीराचे अवयव सापडले. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे चाळीयार नदीच्या काठावरही तपास सुरू आहे.
बुधवारपर्यंत, भूस्खलनात बेपत्ता लोकांची संख्या सुमारे 138 होती, तर 226 हून अधिक लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. याशिवाय, वायनाड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्टपर्यंत आपत्तीग्रस्त भाग आणि चालियार नदीतून 192 मृतदेहांचे अवयव देखील सापडले आहेत. बेपत्ता लोकांवर अद्यापही अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून शोध मोहीम सुरू आहे.
राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड दौऱ्यानंतर लोकसभेत सांगितले की, ही आपत्ती इतकी मोठी आहे की याला याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करायला हवे. नुकसान भरपाईची रक्कम आणखी वाढवून ही आपत्ती राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी, मागणी त्यांनी केली आहे.