पॅरिस येथील ऑलम्पिक स्पर्धेत आज भारत आणि स्पेन यांच्यात हॉकीचा सामना पार पडला. हा सामना कांस्य पदकासाठी पार पडला. सेमीफायनलमध्ये जमिमीकडून पराभव स्वीकारावा लागल्याने आज भारताला स्पेनविरुद्ध कांस्य पदकासाठी सामना खेळावा लागला. या सामन्यात दोन्ही संघानी जबरदस्त खेळ केला. दरम्यान आजचा हा सामना भारतीय हॉकी संघाने जिंकला असून भारताने कांस्यपदकाची कमाई केली आहे.
आजच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने केलेले दोन गोल्स आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव याजोरावर भारताने कांस्य पदक जिंकले आहे. पहिल्या हाल्फमध्ये दोन्ही संघानी आक्रमक खेळ केला. यावेळेत कोटण्याचं संघाला गोल करणे शक्य झाले नाही. मात्र दुसऱ्या हाफमध्ये भारताने चांगला केहल करत कांस्यपदक जिंकले आहे.