Devendra Fadnavis : केंद्र सरकारने लोकसभेत वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केल्यानंतर विरोधकांनी या विधेयकावर जोरदार टीका केली. अशातच आता विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना प्रस्तावित वक्फ बिलाशी काहीही देण – घेणं नसून त्यांना फक्त आपला हक्काचा जमिनी मिळवून देणारा सोर्स घालवायचा नाहीं. कारण आजवर त्यांनी वक्फ बोर्डाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त लोकांच्या जमिनी लाटल्या,अशी घणाघाती टीका राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
https://x.com/i/status/1821799020135645236
केंद्र सरकारने काल गुरुवारी लोकसभेत वक्फ बोर्डाचे नियमन करणाऱ्या कायद्यातील दुरुस्तीसंदर्भातील विधेयक मांडले. परंतु विरोधी पक्षांकडून याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. हे पाहता बिल विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक, राज्यसभेतून मागे घेतले आहे. गेल्या 10 वर्षात म्हणजेच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच एखादे विधेयक सभागृहात अडकून जेपीसीकडे पाठवण्यात आले आहे.