मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्याला सुरूवात केली आहे. सध्या जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ओबीसींमधून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता मराठा ओबीसी आरक्षणाबत राज्य सरकार देखील हालचाली करताना दिसत आहे. लवकरच राज्य सरकार मराठा ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
महायुतीची काल रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडल्याचे समजते आहे. तसेच राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचं लढविणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. महायुतीची बैठक रात्री उशिरापर्यंत चालले असे समजते आहे. ग्रामीण भागात तसेच सर्वत्र महायुतीमध्ये समन्वय राहावा म्हणून महायुतीचे एकत्रित मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला हजर राहणार आहेत.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ ज्याच्या प्रचाराला जातील तो उमेदवार पडायचा असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. सरकारने १० टक्के दिलेले आरक्षण नको असून, आम्हाला ओबीसींमधूनच आरक्षण हवे अशी समाजाची मागणी आहे. त्यामुळे आता आरक्षणाबाबत राज्य सरकार कोणती पावले उचलते ते पाहावे लागणार आहे.