Manish Sisodia : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले आहेत. बाहेर येताच ते खासकरून आपल्या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी हिंडनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत हिंडनबर्गच्या अहवालाबद्दल लिहिले, ‘जर हे खुलासे खरे असतील तर विकसित भारताचा नारा कोणाच्या विकासासाठी दिला जात आहे हे समजते.
मनीष सिसोदिया पुढे लिहितात, “पण, हुकूमशाहीच्या काळात, हे खुलासे खरे असतील तर त्यांची चौकशी होऊ शकेल का? ईडी आणि सीबीआय कधीही तपास करण्याचे धाडस दाखवू शकतील का? की ईडी-सीबीआयला केवळ विरोधी नेत्यांची खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात टाकायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
https://x.com/msisodia/status/1822480917182497015
उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी गेल्या 17 महिन्यांपासून मनीष सिसोदिया हे तुरुंगात होते, अखेर ९ ऑगस्ट रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला आणि अबकारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने तीन अटींवर त्यांचा जमीन मजूर केला, पहिला म्हणजे त्यांना 10 लाख रुपयांचा बाँड भरावा लागेल. याशिवाय त्यांना दोन जामीनही सादर करावे लागतील.तिसरी अट म्हणजे त्यांना त्यांचा पासपोर्ट सरेंडर करावा लागेल.