Raj Thackeray : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. वाघोलीतील उपविभाग प्रमुख प्रकाश जमधडे यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यापूर्वी पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि आता जमधडे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रकाश जमधडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हाती तुतारी घेत पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर त्यांची हवेली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रकाश जमदाडे यांच्यासह मनसेचे हवेली तालुका उपाध्यक्ष अतिश ढगे, अक्षय चोपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण मिंडे, आपचे अजिंक्य शेंडगे अशा अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
ऐन विधानसभेच्या तोंडावर जामधडे यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची या भागात तादक वाढली आहे. अशा स्थितीत पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल अशी चर्चा सुरु आहे.