अमेरिकेच्या सांगण्यावरून आपल्याला सत्तेवरून हटवण्यात आल्याचा दावा माओवादी अध्यक्ष आणि नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी केला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी करण्यात अमेरिकेचा हात असल्याचे प्रचंड म्हणाले आहेत. महिनाभरापूर्वी त्यांना सत्तेवरून हटवण्याचे षडयंत्र सुरू होते असा खुलासा प्रचंड यांनी केला आहे.
माओवादी पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष प्रचंड म्हणाले की, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना एका कटाचा भाग म्हणून हटवण्यात आले. अमेरिकेचे वर्चस्व न स्वीकारल्यामुळे शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यात आले आणि देश सोडण्यास भाग पाडले गेले, अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे, दोन ध्रुवीय विरोधी राजकीय पक्षांमध्ये रातोरात तडजोड झाली आणि परिणामी शेख हसीना यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
प्रचंड म्हणाले की, शेख हसीना पंतप्रधान असताना अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी राज्य भागीदारी कार्यक्रम (एसपीपी) करारावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात होता. या करारात नेपाळचा समावेश करून अमेरिकेला नेपाळमध्ये लष्करी तळ उभारायचा आहे. हा लष्करी तळ भारत आणि चीन या दोघांसाठीही धोकादायक बनला असता, त्यामुळे हसीना कधीही अमेरिकन दबाव स्वीकारला नाही. दक्षिण आशियात अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप हा संपूर्ण क्षेत्रासाठी धोका असल्याचेही प्रचंड यांनी सांगितले आहे. तसेच सर्व दक्षिण आशियाई देशांच्या राजकीय नेतृत्वाने संघटित होऊन त्याचा सामना करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
बांगलादेशातून बाहेर पडायला लागल्यानंतर शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. पण येथून त्यांना लंडन किंवा अमेरिकेला जाण्याचा विचार व्यक्त केला होता.शेख हसीना भारतातून लंडनला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ब्रिटन सरकार कठोर भूमिका दाखवत आहे.ब्रिटिश इमिग्रेशन नियम कोणालाही आश्रय घेण्यासाठी प्रवास करण्यास परवानगी देत नाहीत. ब्रिटनच्या या भूमिकेमुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या त्या भारतात आहेत. गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. मात्र आता अजून काही काळ आता त्यांना इथेच राहावे लागणार आहे. ब्रिटन नंतर अमेरिकेनेही शेख हसीनासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत.अमेरिकेने शेख हसीना यांचा यूएस व्हिसा रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे.