मध्यप्रदेशच्या गुना येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. शा-शिब अकादमीचे दोन आसनी विमान कोसळले. हे विमान चाचणी उड्डाणावर होते आणि दोन वैमानिक उड्डाण करत होते. सुमारे 40 मिनिटे हवेत राहिल्यानंतर विमानात बिघाड झाला आणि लँडिंगदरम्यान दोन्ही पायलट जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देताना गुना कँट पोलिस स्टेशनचे प्रभारी दिलीप राजोरिया यांनी सांगितले की, दोन-आसनी सेसना 152 विमान 40 मिनिटे हवेत असताना अपघात झाला. बहुधा इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास विमान कोसळले.
विमानातील दोन पायलट जखमी झाले. वैमानिकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.लँडिंगदरम्यान गुना एअरस्ट्रीपवर विमान घसरल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ते कोसळले. ज्या विमानाचा अपघात झाला ते चेसना-152 विमान असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅन्ट पोलिसांसह अकादमीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. अपघाताला बळी पडलेले दोन्ही पायलट हैदराबादचे आहेत. हे विमान देखभालीसाठी आणले असताना चाचणी उड्डाणादरम्यान हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथक दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांसह शिव अकादमीचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.