Puja Khedkar : फसवणुकीच्या आरोपावरून प्रशिक्षणार्थी IAS पदावरून हटवण्यात आलेल्या पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने त्यांना तातडीने अटक करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत यूपीएससी व दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, ‘याचिकाकर्त्यावर आरोप असा आहे की त्याने नागरी सेवा परीक्षेत संधी मिळण्यासाठी जाणूनबुजून माहिती लपवली. सध्याच्या खटल्यातील वस्तुस्थिती लक्षात घेता, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत याचिकाकर्त्याला अटक करू नये, असे न्यायालयाचे मत आहे. यूपीएससीनेही या खटल्यात पक्षकार व्हावे, अशी न्यायालयाची इच्छा आहे. जामीन अर्जावर 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
फसवणुकीचे आरोप
पूजा खेडकर हिच्यावर यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या अर्जात ‘चुकीची माहिती’ दिल्याचा आरोप आहे. खेडकर यांच्यावर फसवणूक केल्याचा आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंग कोट्याचा लाभ घेतल्याचाही आरोप आहे. प्रदीर्घ वादानंतर पूजा खेडकर यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली.
यूपीएससीने खेडकर ब्लॅक लिस्ट
यासोबतच यूपीएससीने पूजाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे, म्हणजेच पूजा खेडकर भविष्यात कधीही यूपीएससी परीक्षेला बसू शकणार नाही. यूपीएससीने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली, मात्र, पूजा खेडकरने यूपीएससीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.