Kangana Ranaut : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी हिंडनबर्ग अहवालावर सरकारला कोंडीत पकडले आहे ज्यात त्यांनी अदानी समूह आणि सेबी यांच्यातील संगनमताचा आरोपही केला आहे. यावर कंगना यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
कंगना रणौत आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत म्हंटल्या आहेत की , “राहुल गांधी हे खूप खतरनाक आहे. विषारी, आणि विध्वंसक आहेत. पंतप्रधान होता आले नाही तर ते देश नष्ट करू शकतात, हा त्यांचा अजेंडा आहे. हिंडनबर्ग रिपोर्ट आपल्या शेअर बाजाराला लक्ष्य करतो. त्याचे राहुल गांधींनी समर्थन केले आहे. तो रिपोर्ट निरर्थक ठरला आहे.
देशातील सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी, तुम्ही संपूर्ण आयुष्य विरोधात बसण्यासाठी तयार राहा. देशातील लोकांचा राष्ट्रवाद, गर्व आणि गौरव पाहून तुम्ही असेच निराश होत राहाल. येथील जनता कधीही तुम्हाला नेता मानणार नाही. तुम्ही एक कलंक आहात,”
कंगना यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘ते या देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गांधीजी, तुम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा आणि आता जसे तुम्हाला वेदना होत आहेत, तसेच या देशातील जनतेचा राष्ट्रवाद, अभिमान आणि गौरव पाहून तुम्हाला वाईट वाटेल. इथली जनता तुम्हाला कधीही नेता बनवणार नाही.”
https://x.com/KanganaTeam/status/1822857819168895130
काय म्हणाले राहुल गांधी?
रविवारी हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षांवरील आरोप संस्थेच्या अखंडतेसाठी चिंतेचा विषय आहेत. एक “गंभीर तडजोड” झाली आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणाची पुन्हा स्वत:हून दखल घेणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले की ‘पंतप्रधान मोदी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) तपासाला इतके का घाबरतात हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे, देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचे सरकारसमोर अनेक प्रश्न आहेत: सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? गुंतवणुकदारांचे कष्टाचे पैसे बुडाले तर त्याला जबाबदार कोण – पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेबीचे अध्यक्ष की गौतम अदानी?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.