Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटल प्रकरणातील मृत महिला ट्रेनी डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ममता यांनी कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि कुटुंबीयांशी बातचीत करून त्यांची प्रकृती जाणून घेतली. ममता बॅनर्जी दुपारी 12.45 च्या सुमारास पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीच्या घरी पोहोचल्या.
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावरून देशभरात सुरु असलेल्या निदर्शने दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पोलिसांना कडक इशारा आहे, या प्रकरणाचा छडा रविवारीपर्यंत न लावल्यास ही केस सीबीआयकडे सोपवली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या “आम्ही या प्रकरणाच्या तपासासाठी श्वानपथक, व्हिडीओ विभाग आणि फॉरेन्सिक विभाग तैनात केले आहेत. जर कोलकाता पोलिसांना रविवारपर्यंत या प्रकरणाचा छडा लावता आला नाही, तर आम्ही ते सीबीआयकडे सोपवू.”
सीएम ममता म्हणाल्या की, ही अत्यंत वेदनादायक घटना आहे, या प्रकरणात जो कोणी सामील असेल त्यांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी आमची इच्छा आहे, कारण त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया जलद होईल. रुग्णालयात परिचारिका आणि सुरक्षा कर्मचारी असतानाही ही घटना घडल्याने मला धक्का बसला आहे. त्या पुढे म्हणल्या, पीडितेच्या पालकांनी या गुन्ह्यात आतील लोक देखील सामील असल्याचा आरोप केला आहे.
संपूर्ण प्रकरण?
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये कथितपणे बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला. याप्रकरणी शनिवारी एकाला अटक करण्यात आली. आता या प्रकरणाबाबत देशभरात ठिकठिकाणी निदर्शने होत असून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.
AIIMS, दिल्लीच्या निवासी डॉक्टर्स असोसिएशन (RDA) च्या सदस्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडितेच्या कुटुंबाला पुरेशी भरपाई द्यावी अशा मागण्या करण्यात येत आहेत.