अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त शहरातील बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत आहे. बहिण- भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन सोमवार (दि.१९ ) साजरा होणार आहे. यंदा महागाईमुळे दरांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच मागील काही वर्षात ऑनलाईन राख्या खरेदीला प्राधान्य देण्यात येत, असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यासह पारंपारिक गोंडा राखी (देव राखी) बाजारात विक्रीस दाखल झाली आहे. महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी होत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये लहान, मोठ्या राखी विक्रीचे दुकाने सजल्याचे दिसत आहे. परदेश तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊरावांना वेळेत राखी पोचण्यासाठी एक महिन्यापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला. चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जात आहे. दुसरीकडे व्यवसायिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोनापासून राखी विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. आता परिस्थिती सुधारली आहे. मात्र, या कालावधीत ऑनलाईन खरेदसाठी नागरीक पसंती देत आहेत. किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. सुमारे ५० टक्क्याने ग्राहक वाढले, असेल तरी अनेक नागरीक ऑनलाईन राख्या खरेदी करत असल्याची माहिती व्यवसायिक गजानन आप्पा आणि जगदीश आप्पा यांनी दिली. कुंदन वर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे. चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आले आहे.
राखींमध्ये आले आहेत विशेष प्रकार
यावर्षीही लायटिंग राखीमध्ये स्पिनर लायटिंग राखी आणि कपल राखी अर्थात महिला पुरुष दोघांसाठीही असलेली राख्या बाजारात आल्या आहेत. स्पिनर राखीस असलेले बटन दाबले की विविध रंगीत लायटिंग राखीची आकर्षकता वाढवते. तर कपल राखीमध्ये दोन राख्यांपैकी महिलांना सिंगल दोऱ्याची अर्थात बांगड्यांना बांधता येईल अशी लट राखी आणि तशीच बनावट असलेली डबल दोऱ्याची पुरुषांसाठी राखी नावीन्य आहे.
अशी आहे राखींची किंमत
साधी आणि स्पिनर लायटिंग ४० ते ६५उडन (लाकडी) ३० ते ४०कुंदन वर्क २० ते ११०मोती १० ते ५०जरदोशिवर ३० ते ३५चिडा, लुब्बा २२ ते ५०कपल राखी ४० ते ५०पपेट ५० ते ६०कडा १६५देवराखी एक डझन ०५चांदी पॉलिश राखी १२ ते १००.