लाडकी बहीण योजनेबाबत आपण केलेले वक्तव्य हे गंभीरतेने केले नव्हते ,तर गमतीमध्ये आणि हसत हसत केलेले होते. ते वक्तव्य भावा-बहिणीमधील नात्यामध्ये केले असे स्पष्टीकरण महायुतीचे आमदार रवी राणा यांनी केले आहे.
आशीर्वाद दिला नाही, तर तुमच्या खात्यातून पेसे परत घेऊ, असे विधान केल्यानंतर टीकेच्या धनी बनलेल्या रवी राणा यांनी आता आपले विधान सावरून घेतले आहे. बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने ते बोललो आणि सगळ्या महिला तेव्हा हसत होत्या, असं म्हणत रवी राणा यांनी आपल्या विधानाची सारवासारव केली आहे.
अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार रवी राणा यांनीही हजेरी लावली. याच सोहळ्यात त्यांनी लाडक्या बहिणींना दम दिला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतांचा आशाीर्वाद मिळाला नाहीतर तुमच्या खात्यातून १५०० रुपये काढून घेऊ असे विधान यावेळी आमदार रवी राणा यांनी केले होते.
त्यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. टीकेचे धनी बनताच त्यांनी आपल्या विधानाची सारवासारव केली. बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने ते बोललो आणि सगळ्या महिला तेव्हा हसत होत्या. बहीण भावाचं नातं हे गमतीचे आपुलकीचे आणि प्रेमाचे असते. आणि त्या नात्यांमध्ये मी बोललो मात्र विरोधक त्याचा बाऊ करत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे त्यांनी अशी टीका केल्याचे रवी राणा म्हंटले आहेत. येणाऱ्या काळामध्ये सरकार आल्यावर १५०० रुपयाचा हप्ता ३००० रुपये महिना करण्याची मागणी सुद्धा मी केली आहे. आशा वर्कर मदतनिसचा पगार वाढावा ही सुद्धा मी मागणी केली आहे.असे राणांनी यावेळी सांगितले आहे.