Pune News : पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये आज सकाळी चार बांगलादेशी घुसल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणानंतर दोन तासासाठी कमला नेहरू रुग्णालय बंद करण्यात आले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. यातील एक जण फरार असल्याची माहिती आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुणे परिसरातील महापालिकेकडून चालवण्यात येणाऱ्या कमला नेहरू रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात जात असतात. येथे उपचार अल्प दरात होत असून, रुग्णालयात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते, या गर्दीत चार बांगलादेशी संशयित रुग्णालयाच्या परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली यावेळी त्यांच्यासोबतचा एक व्यक्ती पळून गेला असल्याचा देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यातील काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांना त्यांची उत्तरे संशयास्पद असल्याने पोलीसांनी आता या सर्वांना ताब्यात घेतले असून त्या सर्वांची कसून चौकशी होत आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालय परिसरात या व्यक्तीने काही ठेवलंय का याबाबत सध्या देखील शोध पोलिस घेत आहेत. या सर्व प्रकरणावर अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.