japan : जपानच्या पंतप्रधानांनी राजीनामा जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी स्वतःही ही माहिती दली. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्यास त्यांनी नकार दिला आहे. जपानच्या सरकारी टीव्ही चॅनल ‘एनएचके’च्या बातमीत ही माहिती देण्यात आली आहे.
आगामी निवडणुकीत भाग घेणार नाही
पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी आपल्या सत्ताधारी पक्षाच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे की, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते उतरणार नाहीत. 2021 मध्ये किशिदा यांची सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे.
का दिला राजीनामा?
किशिदाचे यांचे शर्यतीतून बाहेर पाडण्याचे कारण म्हणजे लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात झालेली घट. किशिदा यांच्या कार्यकाळात त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांचा भ्रष्टाचार आणि घोटाळा समोर आला आहे, त्यामुळे त्यांची लोकप्रियता 20 टक्क्यांच्या खाली गेली. अशा परीस्थितीत त्यांनी आगामी पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
ऑक्टोबरमध्ये होणार निवडणूक
खरे तर, जपानचा सत्ताधारी पक्ष यापूर्वी अनेक वादात अडकला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही राजकीय निधीबाबत वाद झाला होता. म्हणूनच पक्षांतर्गतही किशिदा यांच्या विरोधात आवाज उठवला जात आहे आणि सध्याच्या सरकारच्या नेतृत्वाखाली पुढील सार्वत्रिक निवडणुका जिंकणे फार कठीण असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. जपानमध्ये ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार आहेत.