Doda Encounter : गेल्या काही जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी शहीद झाल्याची पुष्टी भारतीय लष्कराने केली आहे. भारतीय लष्कराच्या 48 राष्ट्रीय रायफल्सचा एक कॅप्टन शहीद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळी लष्कराने डोडा भागात दहशतवादविरोधी कारवाई केली होती. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या ठिकाणाहून 4 रक्ताने माखलेल्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत, यावरून 4 दहशतवाद्यांचा एक गट गंभीर जखमी झाल्याचे दिसून येते. मृतदेह बाहेर काढेपर्यंत त्यांची हत्या झाली की नाही याची खात्री करणे कठीण आहे. लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
डोडा जिल्ह्यात गेल्या महिन्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यासह आत्तापर्यंत पाच जवानांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
डोडा येथील गढ़ी भागवा भागात ९ जुलै रोजी संध्याकाळी सुरू झालेल्या चकमकीत लष्कर आणि दहशतवाद्यांकडून सतत गोळीबार सुरू होता. या परिसरात २-३ दहशतवादी अडकल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले. 8 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन ट्रकवर हल्ला केला होता. ज्यात एका कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) ५ जवान शहीद झाले. दुपारचे 3.30 वाजले होते आणि कठुआपासून सुमारे 123 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहाई मल्हार ब्लॉकच्या मछेडी भागातील बदनोटा येथे लष्कराचे सुमारे 12 जवान दोन ट्रकमध्ये जात होते.
दहशतवाद्यांनी आधी लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड फेकले आणि नंतर गोळीबार केला. लष्कराच्या जवानांनी नियंत्रण मिळवून गोळीबार सुरू केला तोपर्यंत दहशतवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. या हल्ल्याची जबाबदारीही काश्मीर टायगर्सने घेतली होती. यामध्ये 3 ते 4 दहशतवादी सामील असल्याची माहिती समोर आली आहे, जे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. या हल्ल्यात स्थानिक गाईडने दहशतवाद्यांना मदत केली होती. ६ जुलै रोजी कुलगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यादरम्यान दोन जवान शहीद झाले.