Kolkata Rape-Murder Case : आरजी मेडिकल कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे, पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. डॉक्टरांनी या गुन्ह्यात एकच व्यक्ती नसून आणखी व्यक्ती सामील असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी फक्त एकच व्यक्ती सहभागी असल्याचे सांगितले होते. मात्र, डॉ.सुवर्णा गोस्वामी म्हणाल्या की, मृताच्या शरीरावरील जखमांच्या खुणा या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचे दर्शवते. तसेच, पोस्टमॉर्टम दरम्यान, पीडितेच्या शरीरात 150 मिलीग्राम वीर्य आढळले.
डॉ. सुवर्णा गोस्वामी म्हणाल्या, पीडितेच्या शरीरात सापडलेले वीर्य एकाच व्यक्तीचे असू शकत नाही. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कारात एकापेक्षा जास्त जणांचा हात असण्याची शक्यता आहे. अशातच पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच आता कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
संजय रॉयला अटक
कोलकाता पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचे प्रकरण उघडकीस येताच आरोपी संजय रॉय (३५) याला २४ तासांच्या आत अटक केली होती. ज्यात पोलिसांनी सांगितले की, या घटनेत एकच व्यक्ती सहभागी आहे. जिथे शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला.
आरोपी सीबीआयच्या ताब्यात
कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या संजय रॉयची सरकारी एसएसकेएम रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ही केस सीबीआयकडे सोपवली आहे. मंगळवारी संध्याकाळी 2 सीबीआय अधिकारी तळा पोलिस ठाण्यात गेले आणि त्यांनी कोलकाता पोलिसांच्या तपासाशी संबंधित कागदपत्रे आपल्याकडे घेतली. कोलकाता हायकोर्टाने मंगळवारी कोलकाता पोलिसांना केसशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपविण्याचे निर्देश दिले होते.