Independence Day : देश आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्त्वाची वास्तू स्वातंत्र्याच्या रंगात रंगल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला आहे. ते सलग 11व्यांदा देशाला संबोधित करत आहेत.
पंतप्रधान आज त्यांच्या 11व्या भाषणात काय बोलणार? तसेच पंतप्रधान कोणती मोठी घोषणा करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग अकराव्या वेळेला ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करणार आहेत. जे सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतल्यानंतरचे त्यांचे भाषण असेल. 15 ऑगस्ट रोजी, पंतप्रधान मोदी 11 स्वातंत्र्यदिनाचे भाषण देणारे तिसरे पंतप्रधान होणार आहेत. याबरोबरच ते पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा विक्रम मागे टाकतील. या पदावर असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2013 या काळात सलग दहा वेळा ध्वजारोहण केले होते.
राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे तिरंगा फडकवणार आहेत. राहुल यांच्याशिवाय एनएसए अजित डोवाल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, किरेन रिजिजू हेही पोहोचले आहेत.
अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत अनेक केंद्रीय मंत्रीही येथे पोहोचले आहेत.