Narendra Modi : भारत 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून सलग 11व्यांदा देशाला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी लष्कराच्या त्याग आणि धैर्याचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, हा तो देश आहे जिथे हल्ले करून दहशतवादी निघून जायचे. पण आता लष्कर सर्जिकल स्ट्राइक करून प्रत्युत्तर देतात. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि हवाई दलाने प्रत्युत्तर दिले होते.
पीएम मोदी म्हणाले, ‘हा तो देश आहे जिथे कधी काळी दहशतवादी हल्ले करून निघून जायचे. पण आता भारतीय लष्कर सर्जिकल करते, देशाचे सैन्य जेव्हा हवाई हल्ला करते तेव्हा देशातील तरुणांना अभिमान वाटतो. युवकांनी छाती अभिमानाने भरते. या देशवासियांना अभिमानाने भरून टाकणाऱ्या गोष्टी आहेत.
तसेच, कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘कोरोनाचे संकट आपण कसे विसरणार, करोडो लोकांच्या लसीकरणाचे काम या देशात जगातील सर्वात वेगाने झाले.
78 वा स्वातंत्र्यदिनाची थीम ‘विकसित भारत’ अशी आहे, जी मोदींच्या भाषणातून ठळकपणे दिसून येत आहे. दरम्यान, मोदी आपल्या भाषणात बांगलादेशातील संकट परिस्थितीचा उल्लेख करू शकतात, तेथे हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांवर देखील बोलू शकतात. .