Independence Day : देश आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतल्यानंतर पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधित करणार हे त्यांचे सलग 11वे भाषण आहे. आजची थीम ‘विकसित भारत’ आहे, भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी विकासबाबत भाष्य केले आहे.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘देश आकांक्षांनी भरलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात कामाला गती देण्यावर आमचा भर आहे. बदलासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर काम करत आहोत. नागरिकांच्या मूलभूत सुविधा बळकट आहे. यामुळे समाज आकांक्षांनी भरलेला आहे. देशातील लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. जागतिक संस्थांचा भारतावरील विश्वास वाढला आहे.”
पुढे ते म्हणाले, ‘आज आपण 140 कोटी नागरिक आहोत. आपण निर्धाराने पुढे गेलो तर आपण प्रत्येक आव्हानावर मात करू शकतो आणि विकसित भारताचे ध्येय गाठू शकतो.’
‘140 कोटींच्या देशातील माझे नागरिक आणि माझे कुटुंबीय एकत्र आले तर कितीही आव्हाने असली तरी आपण समृद्ध भारत घडवू शकतो. 2047 चा विकसित भारत घडवू शकतो.’