PM Narendra Modi : ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नुकतेच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकावण्यात आला. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले, यावेळी ते अनेक मुद्द्यावर भाष्य करताना दिसत आहेत. नैसर्गिक आपत्तींपासून सुधारणा आणि प्रशासन मॉडेल्सपर्यंत अशा अनेक विषयांवर भाष्य केले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पीएम मोदी म्हणाले की,’ या वर्षी आणि गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेकांनी आपले कुटुंब गमावले आहे. मालमत्ता गमावली आहे. राष्ट्रीय तिजोरीचे नुकसान झाले आहे. आज मी त्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि या संकटाच्या काळात देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही देतो.”
तसेच “एक काळ होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान देण्यासाठी बांधील होते आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज देशासाठी जगण्यासाठी बांधील होण्याचा हा काळ आहे. आपला हा संकल्प समृद्ध भारत बनवू शकेल,” असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
पावसामुळे या ठिकाणी झाले नुकसान
यावर्षी देशात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे, कर्नाटक, हिमाचप्रदेश याठिकाणी भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली ज्यामुळे अनेकांनी आपला जवळचा व्यक्ती गमवाल, तसेच अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले, काही भागात अजूनही अशीच परिस्थिती असून, सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे.