PM Narendra Modi : देश आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला असून, ते सलग 11व्यांदा देशाला संबोधित करत आहेत. आजची थीम ‘विकसित भारत’ आहे, भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी विकासबाबत भाष्य केले आहे.
यावेळी त्यांनी वैद्यकीय विभागबात मोठे भाष्य केले आहे. वैद्यकीय विभागाबत बोलताना ते म्हणाले, “विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता 10 वर्षात मेडिकलच्या जागांची संख्या 1 लाख झाली आहे. येत्या पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७५ हजार नवीन जागा निर्माण करून देणार आहोत. मुलांना पोषण मिळावे यासाठी आम्ही राष्ट्रीय पोषण अभियान सुरू केले आहे.”
पुढे त्यांनी, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे विद्यार्थ्यांची आवड वाढली आहे. ही आवड योग्य दिशेने नेण्यासाठी संस्थांना पुढे यावे लागेल. संशोधनासाठी सरकारने मदत वाढवली आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात संशोधन आणि नवोपक्रमावर १ लाख कोटी रुपये खर्च करण्याचे वचन दिले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.