अंमलबजावणी संचालनालयाला अर्थात ED ला नवे संचालक मिळाले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारने आयआरएस अधिकारी राहुल नवीन यांची ईडीच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे यापूर्वी ते ईडीचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते.ईडीच्या संचालकपदावरुन संजय कुमार मिश्रा सुप्रीम कोर्टाने तिसऱ्यांदा मुदतवाढ नाकारल्यानंतर पायउतार झाले आहेत. सध्या प्रभारी संचालक म्हणून राहुल नवीन ही जबाबदारी सांभाळणार आहेत.
सुप्रीम कोर्टानं ११ जुलै रोजी संजय कुमार यांना तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ अवैध ठरवली होती. त्यानंतर त्यांना ३१ जुलैपर्यंत पद सोडण्यास सांगण्यात आले होते. होतं. मात्र, केंद्राच्या विनंतीनंतर त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला संजय कुमार मिश्रा यांना १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. मात्र,अखेर आज संजय कुमार मिश्रा यांचा ईडीमधील कार्यकाळ संपला आहे.
कोण आहेत राहुल नवीन ?
राहुल नवीन यांनी ईडीमध्येच अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. आर्थिक गुन्हे आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित अनेक प्रकरणांच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राहुल नवीन हे ईडीमध्ये २०२० पासूनच कार्यरत आहेत. ईडीचे माजी संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २०२० पासून ते ईडीमध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अर्थमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम केले आहे. आता ते पुढील 2 वर्ष ईडीचे पूर्णवेळ संचालक राहतील.