PM Narendra Modi : स्वातंत्र्य दिनानिमित्त, लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात, PM नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प, भाजप सरकारचे काम आणि इतर गोष्टींबद्दल भाष्य केले. तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचे महत्त्व पटवून देत त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल दु:ख व्यक्त केले.
महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना पीएम मोदी म्हणाले, “आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहेत. त्याविरोधात समाजात संताप आहे. आपल्या राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे जी विश्वास निर्माण करण्यासाठी महत्वाची आहे. अशा गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करणे आवश्यक आहे, त्यावर व्यापक चर्चा व्हायला हवी.
गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करण्यावर भर
काही चिंतेच्या बाबीही असल्याचे पंतप्रधान म्हणाले, “या समाजाचा भाग म्हणून आपल्या माता, बहिणी, मुलींवर होत असलेल्या अत्याचारांचा विचार करायला हवा. तसेच राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. महिलांवरील गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास व्हावा आणि राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी.”
“समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा त्यांची खूप चर्चा होते. पण हे कृत्य करणाऱ्या राक्षसी माणसाला शिक्षा झाली की, ही बातमी छोट्या स्वरूपात दाखवली जाते, यावर चर्चा होत नाही. आता काळाची गरज आहे की, असे पाप करणाऱ्या गुन्हेगारांबद्दल व्यापक चर्चा व्हायला हवी जेणेकरून असे पाप करणाऱ्यांना फासावर लटकावे लागेल अशी भीती निर्माण होईल. ही भीती निर्माण करणे मला महत्त्वाचे वाटते.”