Gold Silver Price Today : रक्षाबंधनपूर्वीच ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे, आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे, आता खरेदीदारांना सोने खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
सोमवारी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि आयुष्यभर त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. त्या बदल्यात भाऊही बहिणींना भेटवस्तू देतात. जर तुम्हीही या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला सोन्याचे किंवा चांदीचे दागिने देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या ही बातमी महत्वाची ठरेल. किती रुपयांनी महागले सोने पाहूया…
चांदीच्या किमती
आज सकाळी चांदीच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी चांदी 1869 रुपयांनी वाढून 81,930 रुपये किलोवर पोहोचली. तर 14 ऑगस्ट रोजी चांदीची 80,061 रुपये प्रति किलो होती.
सोन्याच्या किमती
शुक्रवारी चांदीबरोबरच सोन्याच्या दरातही वाढ पाहायला मिळाली. सराफ बाजारात सोन्याचा भाव 70,366 रुपयांवर पोहोचला असून 230 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. बुधवारी सोने 70,136 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीच्या किमती :-
दिल्ली :- 24 कॅरेट सोने 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84,000 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
मुंबई :- 24 कॅरेट सोने 71,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84,000 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
पुणे :- 24 कॅरेट सोने 71,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
चेन्नई :- 24 कॅरेट सोने 71,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 89,000 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
कोलकाता :- 24 कॅरेट सोने 71,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
लखनौ :- 24 कॅरेट सोने 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84,000 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
नोएडा :- 24 कॅरेट सोने 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84,000 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.