अमेरिकेत पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थी आक्रमक होत असून, त्यांनी विद्यापीठांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. डेमोक्रेटिक सोशालिस्ट्स ऑफ अमेरिकाच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले आहे. त्यामध्ये शस्त्रसंधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू मांडली जात आहे. यामुळे तीन प्रतिष्ठित विद्यापीठांच्या प्रमुखांनी राजीनामे दिले आहेत.
कोलंबिया विद्यापीठाचे प्रमुख मिनोचे शफीक यांनी नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपूर्वी पदाचा राजीनामा दिला पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या प्रमुख लिज मैगिल यांनी डिसेंबरमध्ये राजीनामा दिला, तर जानेवारीत हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रमुख क्लॉडाइन गे यांनीही पद सोडले. हे राजीनामे विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे झाले आहेत.
गेल्या शैक्षणिक सत्रातदेखील अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. त्यावेळी काही विद्यापीठांमध्ये हिंसक घटनाही घडल्या होत्या. विशेषत: कोलंबिया आणि कॅलिफोर्निया विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले होते. या वर्षी मात्र विद्यार्थ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी सत्रात विद्यापीठांवर बहिष्कार टाकला जाईल आणि विद्यार्थी घरीच अभ्यास करतील.
द फ्री प्रेसच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील लोकशाही, समाजवादी तरुणांची संघटनाअसलेल्या वायडीएसएने गेल्या महिन्यात एक योजना बनवली होती. त्यानुसार देशातील 100 हून अधिक विद्यापीठांमधील सदस्यांना आंदोलनात भाग घेण्याचं आवाहन करण्यात आले होते.पॅलेस्टाईनसाठी विद्यार्थी संपावर अशी त्याची टॅगलाईन होती. वायडीएसएनं 2024-25 पासून सुरुवातीच्या शैक्षणिक सत्रांमध्ये विद्यापीठांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. .
या आंदोलनात देशभरातील १०० हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. पॅलेस्टाईनसाठी विद्यार्थ्यांनी हा संप सुरु केला आहे, या आंदोलनाची तयारी वायडीएसएकडून (YDSN) गेल्या महिन्यात केली होती. मात्र हे आंदोलन किती काळ टिकणार आहे, याबद्दल मात्र अद्याप कोणतीही निश्चितता नाही.