Chitra Wagh : ओ ऽऽऽऽखोटारड्या बारामतीच्या मोठ्या ताई,अहो किती फेकाफेकी करणार? ‘खोटं बोल, पण रेटून बोल..’ हे ब्रीदवाक्य तुम्हीच तुमच्या ‘महाभकास बिघाडी’ ला दिले असणार! अशा शब्दात भाजपच्या फायर ब्रँडनेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
‘एक्स’ या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी सुप्रिया सुळे यांचा महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्यातला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात सुळे म्हणतांना दिसतात ‘की निरागस असणारं बहीण भावाचं प्रेम त्याला किमंत लावायच पाप या सरकारने केलं आहे. तसेच आमचे सरकार मधले दोन भाऊ असं म्हणतात की, जसे आम्ही पैसे देऊ शकतो तसें पैसे परत घेण्याची देखील आमची ताकत आहे! यावरून हे आमचे भाऊ कसे आहेत याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत सुप्रिया सुळे यांना चांगलेच सुनावले आहे.
ओ ऽऽऽऽखोटारड्या बारामतीच्या मोठ्या ताई,
किती फेकाफेकी करणार ? 'खोटं बोल, पण रेटून बोल..' हे ब्रीदवाक्य तुम्हीच तुमच्या 'महाभकास बिघाडी' ला दिलं असणार!
तुमच्या म्हणण्याप्रमाणे, बहीण भावाच्या निरागस नात्याला किंमत लावण्याचे पाप आघाडीची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये सुरू आहे.… pic.twitter.com/KzoHyl8bQS
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 16, 2024
तुमच्या म्हणण्याप्रमाणे, बहीण भावाच्या निरागस नात्याला किंमत लावण्याचे पाप आघाडीची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये सुरू आहे. त्यांना जाब विचारण्यासाठी कधीतरी तोंड उघडले का हो ? ती हिंमत आहे का ?
ऊठसूठ ‘महायुती’ च्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करायचे उद्योग आता बंद करा.. ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत महाराष्ट्रातील जनता नाही. ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा तुमचा धंदा छानपैकी सुरू ठेवा. आता, निवडणुकीत जनताच उत्तर देईल. असे म्हणत खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.