Donald Trump : अमेरिकेचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. यावेळी त्यांनी माझ्या मनात त्यांच्याबद्दल विशेष आदर नसल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. तसेच कमला हॅरिस याला काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्रत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मला त्यांच्याबद्दल काही विशेष आदर नाही. तसेच मला त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल देखील फारसा आदर नाही. मला विश्वास आहे की, जर त्या राष्ट्रपती बनल्या तर खूप वाईट बनतील.’
खरं तर, ट्रम्प यांच्या पक्षाच्या सदस्यांनी हॅरिसवर वैयक्तिक हल्ले करू नयेत अशी विनंती केली होती आणि ट्रम्प त्यांच्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देत होते. ट्रम्प म्हणाले, ‘जोपर्यंत हॅरिसवरील वैयक्तिक हल्ल्यांचा प्रश्न आहे, त्यांनी देशासाठी जे केले त्याबद्दल मला खूप राग आहे. न्याय व्यवस्थेचा वापर माझ्या आणि इतरांविरुद्ध शस्त्र म्हणून केल्याबद्दल मला त्याचा राग आहे. आणि मला असे वाटते की मी वैयक्तिक हल्ले करू शकतो.”
लोकप्रियतेत कमला हॅरिस ट्रम्प यांच्या पुढे
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदासाठी कमाल हॅरिस यांना उमेदवारी मिळाली.
कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या लोकप्रियतेच्या बाबतीत आघाडीवर आहेत, लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांनी प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प मागे टाकले आहे, अशातच त्या आगामी निकवडणुका जिंकून अध्यक्षपदावर विराजमान होतील असे मानले जात आहे, एका सर्वेक्षणानुसार हॅरिस सर्व राष्ट्रीय सर्वेक्षणांच्या सरासरीमध्ये लोकप्रियता रेटिंगमध्ये ट्रम्प यांच्यापेक्षा बऱ्याच गुणांनी पुढे आहेत.