पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॉईस ऑफ द ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीत ग्लोबल साऊथमधील देशांना संतुलित आणि सर्वसमावेशक विकास साधण्यास मदत करण्यासाठी सर्वसमावेशक ‘जागतिक विकास करार’ अर्थात ‘ग्लोबल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट प्रस्तावित केला.
आपल्या समारोपाच्या भाषणात, पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या बाजूने सर्वसमावेशक “जागतिक विकास करार” प्रस्तावित केला आणि सांगितले की या कराराचा पाया भारताच्या विकासाच्या प्रवासावर आणि त्यातील भागीदारीच्या अनुभवांवर आधारित असेल. ग्लोबल साऊथच्या देशांनी स्वत: ठरवलेल्या विकासाच्या प्राधान्यांनुसार हा करार चालेल यावर मोदींनी भर दिला. विकासासाठी तो मानवकेंद्रित आणि बहुआयामी असेल आणि बहु-क्षेत्रीय दृष्टिकोनाला चालना देईल, असे ते म्हणाले आहेत.
ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट हा ग्लोबल साऊथच्या देशांनी ठरवलेल्या विकास प्रवासातून प्रेरित असेल आणि गरीब राष्ट्रांना मोठ्या कर्जाखाली चिरडणार नाही यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. पुढे पंतप्रधान म्हणले की, विकास वित्ताच्या नावाखाली गरजू देशांवर कर्जाचा बोजा पडणार नाही. .हे भागीदार देशांच्या समतोल आणि शाश्वत विकासाला समर्थन देईल या ‘विकास करार’ अंतर्गत, आम्ही विकासासाठी व्यापार, शाश्वत विकासासाठी क्षमता निर्माण, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, प्रकल्प विशिष्ट सवलतीचे वित्त आणि अनुदान यावर लक्ष केंद्रित करू.
पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की भारत व्यापार प्रोत्साहन क्रियाकलापांना समर्थन देण्यासाठी US$2.5 दशलक्षचा विशेष निधी देणार आहे. . क्षमता वाढीसाठी व्यापार धोरण आणि व्यापार वाटाघाटींचे प्रशिक्षण दिले जाईल, असे ते म्हणाले. यासाठी एक दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे.
पंतप्रधान म्हणाले की, ग्लोबल साउथच्या देशांमध्ये आर्थिक ताण आणि विकास निधीचे निराकरण करण्यासाठी भारत एसडीजी प्रमोशन लीडरशिप ग्रुपमध्ये योगदान देत आहे. ग्लोबल साउथला परवडणारी आणि प्रभावी जेनेरिक औषधे देण्यासाठी आम्ही काम करू. औषध नियामकाच्या प्रशिक्षणातही आम्ही सहकार्य करू. कृषी क्षेत्रातील ‘नैसर्गिक शेती’चे आमचे अनुभव आणि तंत्रे सांगण्यास आम्हाला आनंद होईल.
पायाभूत सुविधा, डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणाऱ्या भागीदार देशांसोबत भारताने आपला अनुभव आणि प्रगती कशी विभागून घेतली आहे यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.
ग्लोबल नॉर्थ आणि साऊथमधील अंतर कमी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे मोदी म्हणाले आहेत. पुढील महिन्यात होणारी UN मधील भविष्यातील शिखर परिषद या सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल.