कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही इंडी आघाडी म्हणजे बलात्कारी बचाव आघाडी विशीष्ट धर्माच्या गुन्हेगारांना वाचवण्याचा हीन प्रयत्न करत आहे, या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी -वाड्रा, शरद पवार, सुप्रिया सुळे , अखिलेश यादव , उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही मंडळी एक शब्दही काढत नाहीत . मात्र अशा बलात्काऱ्यांच्या, लव्ह जिहाद्यांच्या विरोधात लढण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्धार आहे असे भारतीय जनता पार्टीचे नाशिक भाजप अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भाजप कार्यालयातून काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात जाधव पुढे म्हणाले की विशीष्ट सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधीत , विशीष्ट धर्माशी संबंधीत बलात्कारींना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुलेआम पाठीशी घालत आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या गुन्हेगारांना कठोर शासन देण्याबाबत इंडी आघाडीने मौन बाळगले आहे असे सांगून, प्रशांत जाधव यांनी इंडी आघाडीवर हल्लाबोल केला आहे .
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की बलात्काऱ्यांना संरक्षण देऊन पश्चिम बंगालला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बलात्कारीना मोकाट फिरण्याची जणू मुभाच दिली आहे. वर्षोनवर्षे अशा बलात्काराच्या निंदनीय घटना पश्चिम बंगालमध्ये होत आहेत, मात्र या प्रकरणांत बलात्कारी गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासंदर्भात इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांचे मौन हे बरेच काही सांगते. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, या विरोधात आवाज उठविणाऱ्या सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रशांत जाधव यांनी सांगितले की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राक्षसी बलात्कार केलेल्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे वक्तव्य करतात. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी , इंडी आघाडीच्या नेत्यांना बलात्का-यांबाबत सहानुभूती आहे असे ते म्हणाले. इंडी आघाडीला पिडीत महिलांबाबत जरा सुद्धा कळवळा नाही. विशीष्ट धर्माचे लोक अपराधी असल्यानंतर पिडीतांना न्याय देण्याऐवजी ही मंडळी बलात्कारी , गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. इंडी आघाडी ही बलात्कारी बचाव आघाडी असून त्यांच्या अपराध्यांना पाठीशी घालण्याच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.