Pakistan Tahawwur Rana : मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात सहभागी असलेला तहव्वूर राणा याला अमेरिकेतील न्यायालयाने मोठा दणका दिला. राणाला भारताकडे सोपावलं जाऊ शकतं असा निर्वाळा अमेरिकेतील कोर्टाचा दिला आहे. प्रत्यार्पणाच्या विरोधातील राणाची (Tahawwur Rana) याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
न्यायालयाने अपील फेटाळली
अमेरिकेच्या न्यायालयाने गुरुवारी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, “भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाला प्रत्यार्पण करण्याची परवानगी आहे. 63 वर्षीय राणाने अमेरिकेच्या मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत यचिका दाखल केली होती.
जिल्हा न्यायालयाने प्रत्यार्पणाला परवानगी दिली होती
न्यायालयाने प्रत्यार्पणाच्या विरोधातील राणाची याचिका आता फेटाळून लावली आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याच्या कारणावरून त्याला भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते, असा निकाल जिल्हा न्यायालयाने दिला होता.
कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने आधी राणाला भारताच्या ताब्यात दिले जाऊ शकते असा निकाल दिला होता. या निकालाविरोधात राणाने अमेरिकेच्या कोर्ट ऑफ अपील येथे दाद मागितली होती.
दहशतवादी डेव्हिड हेडलीशी संबंध
राणा, सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे, त्याच्यावर 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील सहभागाचा आरोप आहे आणि त्याचा पाकिस्तानी-अमेरिकन लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंध असल्याचे मानले जाते. हेडली हा अनेक दहशतवादी घटनांचा मुख्य सूत्रधार मानला जातो.
प्रत्यार्पणाच्या आदेशाच्या बंदिस्त कॉर्पस पुनरावलोकनाच्या मर्यादित व्याप्तीच्या अंतर्गत, पॅनेलने असे मानले की राणाचा कथित गुन्हा यूएस आणि भारत यांच्यातील प्रत्यार्पण कराराच्या अटींमध्ये येतो, ज्यामध्ये प्रत्यार्पणाचा अपवाद (दुहेरी जोखमीचा) अपवाद समाविष्ट आहे.