Bangladesh Violence : बांगलादेशच्या संस्कृतीत कला आणि संगीत कितीही महत्त्वाचे असले तरी कट्टर इस्लामी संघटनांना ते मान्य नाही. त्यांना देशात शरिया कायदा लागू करायचा आहे, इस्लामी राजवट आल्यानंतरच लोकांना न्याय मिळू शकेल, असा त्यांचा विश्वास आहे.
सध्या ‘हिफाजत-ए-इस्लाम’ ही बांगलादेशातील कट्टरतावादी मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना बनली आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार आणि मंदिरांवरील हल्ल्यांमध्येही या संघटनेचा हाथ असल्याचे बोलले जात आहे, या संघटनेने 2021 मध्ये पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्यालाही विरोध केला होता.
शेख हसीना यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणांना या संघटनेचा कडाडून विरोध आहे, कारण त्यांना बांगलादेशात शरिया कायदा लागू करायचा आहे. संघटनेशी संबंधित अबुल फैयाज मोहम्मद खालिद हुसैन हे बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये धार्मिक बाबींचे सल्लागार आहेत. दैनिक भास्करने ‘हिफाजत-ए-इस्लाम’चे उपाध्यक्ष मुहिउद्दीन रब्बानी यांच्याशी बातचीत केली असता, त्यांची संस्था इस्लामचे रक्षण करण्यासाठी आणि धर्माची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. असे म्हंटले आहे.
रब्बानी म्हणाले की, “त्यांची संस्था इस्लामचे रक्षण करण्यासाठी आणि धर्माची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. बांगलादेशात इस्लामिक राजवट प्रस्थापित व्हावी आणि लोकांना न्याय मिळावा, अशी संघटनेची इच्छा आहे. रब्बानी म्हणाले की, देशात पुतळे उभारले जाऊ नयेत, जे पुतळे बांधले आहेत ते सरकारने पाडावेत. तसेच रब्बानी यांनी बंगदेशात असलेल्या, मंदिरांतील मूर्ती फोडू नका असे आवाहन देखील केले आहे. रब्बानी म्हणाले की, शेख मुजीबुर रहमान यांच्या देशभरात बांधण्यात आलेल्या सर्व मूर्ती पाडण्यात यावेत.
पुढे ते म्हणाले, आम्हाला संगीत आणि कला अजिबात आवडत नाही, त्यामुळे निजामी राजवटीत हे चालणार नाही, महिलांनी हिजाबमध्येच राहावे. भारतातील हिंदूंना आवाहन करताना रब्बानी म्हणाले की, ज्याप्रमाणे आम्ही बांगलादेशातील मंदिरांचे रक्षण करत आहोत, त्याचप्रमाणे तुम्ही भारतातील मुस्लिम आणि त्यांच्या धर्माचे रक्षण करा. देशाच्या अंतरिम सरकारबाबत संघटनेने म्हटले की, ते नव्याने स्थापन झाले आहे, ते काय करते ते पाहू. आम्ही नवीन सरकार निवडू आणि ते देशावर राज्य करेल.