Maharashtra Political News : वन नेशन, वन इलेक्शन हा मोदींचा नारा आहे. त्यामुळे हरयाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका एकत्र होणे अपेक्षित होते. मात्र झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका या मुद्दामहून लांबणीवर टाकल्या, सत्ताधाऱ्यांना झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी गडबड करायची आहे आणि महाराष्ट्राची तिजोरी खाली करायची आहे, म्हणून या राज्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन याबाबत घोषणा केली. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला घेरले आहे, नुकताच हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला, तर झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणूक लांबणीवर पडल्या. यावर निडणूक आयोगाने राज्यात पावसाळ्यामुळे आणि आगामी सणांमुळे तयारीला वेळ लागणार असल्याचे कारण दिले. यावरच राऊतांनी तुम्ही वन नेशन, वन इलेक्शन अशी घोषणा करता तर त्याचे पालन देखील करा असे म्हंटले आहे.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कधी होणार निवडणूक ?
या दोन्ही राज्यांमध्ये १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत निवडणुका पार पडणार आहे. तर या दोन्ही राज्यांचे निकाल ४ ऑक्टोबरला लागणार आहेत. हरियाणातील सरकारचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनी निवडणुका होत आहेत.
जम्मू-काश्मीर येथे 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 1 ऑक्टोबर 2024 रोजी एकाच टप्प्यात हरियाणातील मतदान होणार आहे.