Eknath Shinde : काही लोकांना आपली संस्कृती बदलायची आहे. म्हणून ती लोकं कायम विवादास्पद विधानं करत असतात जेणेकरून समाजात कायम वितुष्ट निर्माण व्हावी. पण असं असताना देखील या विघ्नसंतोषी लोकांना आपले मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर त्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवलं पाहिजे. असला मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काही तरी डोकं चालवून काम कराव, अशी घणाघाती टीका माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुस्लिम समाजाला येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व द्यावं यासाठी दलवाई राज्यभर फिरत आहेत. आज ते सोलापूरात असताना त्यांनी हे विधान केलं.
दलवाई म्हणाले की, एकमेकांच्या धर्माचा आदर करणारा आपला समाज आहे. ईदच्या वेळी हिंदू समाज मुस्लिम समाजाला शुभेच्छा देतात, तर दिवाळीला मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात, ही या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे.
दरम्यान, नगर येथील प्रसिध्द संत रामगिरी महाराज यांनी मुहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेल्या विधानावर समाजाच्या विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ५० वर्षे वयाच्या मुहम्मदाने फक्त ६ वर्षे वयाच्या आयेशा सोबत लग्न केले होते.त्यामुळे स्त्रीवर अत्याचार करणारे ज्यांचे रोल मॉडेल असतील त्या लोकांत पुढे देखील स्त्रीवर अत्याचार करणारे लोकंच तयार होतील असं विधान रामगिरी महाराजांनी केलं होतं.