Harbhajan Singh : कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमध्ये घडलेल्या हत्या आणि बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या भयावहक घटनेने देशातील प्रत्येक नागरिक हादरला आहे. या प्रकरणी सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याने देशभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी आणि राजकीय पक्षही या विरोधात आवाज उठवत आहेत.
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनीही आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली होती. आता या मोहिमेत माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगचेही नाव जोडले गेले आहे. त्याने पश्चिम बंगाल सरकार, सीबीआयला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
हरभजन सिंगने ममता सरकार आणि सीबीआयला लिहिलेल्या पत्रात बलात्कार ही सामाजिक समस्या असल्याचे वर्णन केले आहे. पत्रात म्हंटले आहे की, कोलकाता येथील घटना एका व्यक्तीवर झालेला सामान्य गुन्हा नाही. यातून संपूर्ण समाजातील महिलांचा सन्मान दुखावला गेला आहे. रुग्णालयासारख्या ठिकाणी अशा घटना घडल्याने ही समस्या किती टोकाला गेली आहे, हे लक्षात येते. या पात्रता डॉक्टरांबद्दल सहानुभूती व्यक्त करत सांगितले की, ते आधीच आव्हानात्मक वातावरणात काम करत आहेत. अशी घटना घडल्यास त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवता कामा नये.”
कारवाईची मागणी
कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल हरभजनने आपल्या पत्रात निराशा व्यक्त केली आहे. या घटनेला इतके दिवस उलटून गेले तरी दोषींवर योग्य ती कारवाई झालेली नाही, असे हरभजनचे म्हणणे आहे. त्यामुळे डॉक्टरांचा संप पूर्णपणे रास्त आहे. न्यायासाठीच्या या लढ्यात मी डॉक्टरांसोबत असल्याचे हरभजन पुढे म्हणाला. खेळाडूने बंगालच्या ममता सरकार आणि सीबीआयकडे याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या क्रिकेटपटूंनीही आवाज उठवला
अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारे जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला होता. सोशल मीडियाच्या मध्यमातून आवाज उठवून त्यांनी कारवाईची मागणी केली.